Training Institutes
२१ वे राज्यस्तरीय प्रेरणा शिबिरस्नेह
*सेवांकुर-२०१७ * *२१ वे राज्यस्तरीय प्रेरणा शिबिरस्नेहालय पुनर्वसन संकुल, एम.आय.डी.सी, अहमदनगर (११-१२-१३ ऑगस्ट)* आपल्यापैकी अनेकांना आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याची ईच्छा असते. स्वत:साठी जगतांना इतरांसाठी/समाजासाठीही थोडं जगावं, आपले आयुष्य सेवेच्या परीसस्पर्शाने आशयसंपन्न करावे, असंही वाटते. परंतु अनेकदा दिशाच सापडत नाही. योग्य मार्गदर्शन मिळत नाही. अशा प्रश्नाची उत्तरं मिळण्यासाठी १० वर्षांपूर्वी सेवांकुर या तरुणासाठीच्या खुल्या मंचाची सुरुवात बाबा आमटेंच्या आनंदवनात डॉ. अविनाश सावजी व अन्य समविचारी मित्रांच्या पुढाकारातून झाली. आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सेवांकुरची २० प्रेरणा शिबिरे झालीत. या शिबिरांमधून प्रेरणा घेतलेले अनेक तरुण आपल्या आयुष्यात काही वेगळे करताना आज दिसतात. शिवाय त्यांच्यामुळे इतर अनेकांची आयुष्ये पण बदलल्याचे दिसून येते. *सेवांकुर २०१७ शिबिरात का यावे ?* आपले स्वतःच्या आयुष्यात स्वप्ने कशी पाहावीत व पाहिलेली स्वप्ने प्रत्यक्षात कशी आणावीत हे समजून घेण्यासाठी. आयुष्यातील अत्यंत महत्वाचे व दूरगामी परिणाम करणारे निर्णय विचारपूर्वक व पूर्ण भान ठेऊन कसे घ्यावेत याबाबत स्पष्टता येण्यासाठी. आपल्या आयुष्यात ज्यांनी काहीतरी विशेष व वेगळे केलेले आहे अशा अनेक ज्येष्ठ मित्रांचे अनुभव ऐकण्यासाठी, त्यांच्या सहवासात काही क्षण घालविण्यासाठी, त्यांचे प्रयत्न, प्रेरणा, अडचणी, यश-अपयशांचे क्षण, वाटचाल, त्यांना आलेले कडू-गोड अनुभव ऐकण्यासाठी व त्याद्वारे आपली बॅटरी चार्ज करून घेण्यासाठी, राज्यभरातील समविचारी मित्रांची साखळी जोडण्यासाठी. तुमच्यापैकी पण अनेकांनी काही स्वप्ने पाहिली असतील व त्या दिशेने काही कृती केलेली असेल तर त्या अनुभवांचे शेअरिंग करण्यासाठी. *शिबिरासाठी ऑनलाईन नाव नोंदणीसाठी या https://goo.gl/7YSh2T <https://l.facebook.com/l.php?u=https%3A%2F%2Fgoo.gl%2F7YSh2T&h=ATMrXddgJG w94Bm7K8drM3TOqo1t9pZd9yUamEOTQb88SAj20LRTrb1Cma46Mg1pFl4024ZWWJi6ONlVhN6 वय वर्षे १८ पेक्षा जास्त असलेल्या (वयाची वरची मर्यादा नाही) व ज्यांना स्वतःच्या आयुष्यात काहीतरी वेगळे करायचे आहे अशा राज्यभरातील निवडक ३०० तरुणाना. शिबीरार्थीनी शिबिरानंतर आपण काय करणार आहोत त्या कार्ययोजनेचे संकल्प पत्र देणे पण अपेक्षित असणार आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० जुलै २०१७ असली तरी प्रवेशसंख्या आधीच पूर्ण होऊ शकत असल्याने लवकरात लवकर नोंदणी करावी. दि. ३१ जुलैला शिबीरासाठी निवड झालेल्याना इमेल व एसएमएस द्वारे कळविण्यात येईल.
शिबिरासाठी नाव नोंदणी शुल्क विद्यार्थांना किमान २०० रु. व जास्त आणि इतरांसाठी ५०० रु. व जास्त असे असेल. निवास-भोजनाची मोफत सोय. निवड झालेल्या शिबीरार्थीनी ११ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी १० वा. शिबीरस्थळी उपस्थित रहावे. शिबीर निवासी असल्यामुळे ३ दिवस आणि २ रात्र मुकामासह सर्व सत्रांना उपस्थिती अनिवार्य आहे.
*Contact for details :*
Vikas Sutar 9823989592, Nisha Tirwadi 7218003074, Nitin Waware 9011026472, Santosh Garaje- 7588177979, Mahesh Pawar 9423435255, Devendra Ganvir- 9420362643
~ ngoportal
« Back
Financial & Grants Management
|